Pratibha Patil - Member of Legislative Assembly (MLA)

विधानसभा

महाराष्ट्रातील आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेता आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष पदही भूषविले. आरोग्य, पर्यटन, संसदीय कार्य, गृहनिर्माण, शहरीविकास, समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य, सार्वजनिक आरोग्य, दारू-बंदी, पुनर्वसन, शिक्षणमंत्री अशा विभिन्न खात्यांचा कारभार अत्यंत कुशलतेने सांभाळला.

Pratibha Patil - Rajya Sabha (MP)

राज्यसभा

१९६२ साली जळगावहून व नंतरच्या चार निवडणुका एदलाबाद (आताचे मुक्ताईनगर) येथून लढवून जिंकल्या. ताईंनी विधानसभेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला आणि आपल्या झंझावाती कार्यकर्तृत्वाने जीवनाला वेगळे वळण दिले. असंख्य अडचणी, विरोध यावर यशस्वीपणे मात केली. आपण स्वीकारलेला जनसेवेचा वसा साधेपणाने राहून प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले; म्हणून त्यांना ताईचा (मोठ्या बहिणीचा) मान साऱ्या महाराष्ट्राने दिला.

Lok Sabha (MP)

लोकसभा

ताईंनी लोकसभेच्या सहाव्या निवडणूकीत अमरावती मतदारसंघामधून निवडणूक लढविली. त्या निवडून आल्या. लोकसभेत त्यांनी आपल्या उत्तम सहभागाची चुणूक दाखविेली. राष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत हिताच्या प्रश्‍नांवर त्यांनी आपला आवाज उठविला विविध विषयांवरच्या चर्चेत सहभाग घेऊन आपल्या सक्रियतेचा प्रत्यय दिला. केवळ एका विषयांवर लक्ष केंद्रित केले नाही तर त्यांनी सहभाग घेतलेल्या विषयांमध्ये कुटुंब नियोजन, बँकिंग, सहकारी संस्था ते बाबरी मशिदीचे पतन आदि विषयांवर त्यांनी आपली परखड मते मांडली. त्यांची संसदीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्तीही झाली. १९९५ साली त्यांनी बिजिंग येथे स्त्रीयांच्या समस्येंवर होणार्‍या जागतिक परिषदेंसाठी त्यांनी भारताच्या प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला.

Pratibha Patil - Flight to Governorship

राज्यपालपद

ताई या राजस्थानच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून नोव्हेंबर २००४ मध्ये नियुक्त झाल्या. या ठिकाणी त्यांच्या जबाबदारीचे स्वरूप वेगळे होते. राज्यस्थान राज्याच्या त्या घटनात्मक प्रमुख होत्या, राज्यातील विद्यापीठांच्या त्या कुलपती होत्या आणि पश्‍चिम विभागाच्या सांस्कृतिक केंद्राच्या त्या प्रमुख होत्या. त्यांनी या विविध जबाबदार्‍या समर्थपणे पार पाडल्या. विशेषकरून या काळात त्यांनी आरोग्यसेवेत लक्षणीय सुधारणा, जवानांच्या विधवा आणि उच्च शिक्षण या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले.

National Portal Of India
Make in India
National Informatics Center
GOI Web Directory

संपर्क साधा

Translate »