शाश्वत नागरी विकासांसाठी : रोशनी

तार्इंना पर्यावरणाबाबत आस्था होती. वाढत्या नागरीकरणामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणांवर हानी होईल अशी चिंता व्यक्त केली जात असे. तार्इंनी पर्यावरणाच्या सर्वांगीण व्यवस्थापनासाठी पर्यावरणपूरक रोशनी या बोधवाक्याद्वारे ध्येय धोरणाचा पुरस्कार केला. याबाबत त्यांनी सुरुवातीचे सकारात्मक पाऊल उचलले. राष्ट्रपती भवन हे हरित आणि पर्यावरण स्नेहाचा पुरस्कार करणारे असेल याची दक्षता घेतली. तसेच या ठिकाणी ऊर्जासंवर्धन आणि वापर यांचा योग्य वापर होईल यासाठी काही ठोस पध्दती आखल्या. पर्यावरण व्यवस्थापन हे स्त्रीया आणि मुलें यांच्या माध्यमातून सजग विकास आणि सक्षम समाज होण्यासाठी त्यांनी सल्लागार समितीची नियुक्ती केली. या समितीने १३ पर्यावरण विकास प्रकल्पांची अंमलबजावणी केली.

राष्ट्रपती भवनाच्या परिसरातील या पहिल्या नागर वस्तीला पर्यावरण व्यवस्थापन पध्दत परिणामकारकरीत्या राबविल्याबद्दल ISO १४००१:२००४ चे प्रशस्तीपत्र लाभले.

रोशनीचा प्रसार

रोशनी योजनेचा सार्वत्रिक प्रसार होण्यासाठी ‘ रोशनी सर्वत्र – शाश्वत नागरी वसाहतीसाठी हरित क्रांती’ या परिषदेचे मे २०११ मध्ये राष्ट्‌पती भवनात आयोजन केले. तार्इंनी या प्रसंगी राज्यांच्या राज्यपालांना आवाहन करताना सांगितले की, त्यांनीही आपल्या राजभवनांमध्ये या हरितक्रांतीचा संदेश राज्यांत राबवावा. हा प्रयोग त्यानी सिकंदराबाद येथील राष्ट्रपती निलायम येथे वनौषधी, फळबागा यांची लागवड करून सौरऊर्जेचा वापर आणि पाण्याचे संवर्धन करून हरित क्रांतीचा संदेश अमलात आणला.

बचत गटांची स्थापना

राष्ट्रपती भवनाच्या परिसरांत ५ बचत गटाची स्थापना केली गेली. या बचत गटाद्वारे वनस्पतीपासून तयार केलेले खत, सेन्द्रिय खत, कागदी पिशव्या, कागदी पाकिटे, घरगुती मसाले तयार करणे आदि कामे या बचत गटाद्वारे केली गेली. त्यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि असे स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल समाजाची प्रशंसाही लाभली.

रोशनी प्रचोदय संस्था

रोशनीचा व्यापक प्रसार होण्यासाठी आणि त्याला स्वायत्त स्वरूप मिळण्यासाठी ‘रोशनी प्रचोदय सोसायटी’ ची कायदेशीर नोंदणी करण्यात आली. या सोसायटीला कायदेशीर स्वरूप देण्यात आल्याने नागरी वसाहतीमध्ये हरित क्रांतीचा प्रसार सातत्याने करण्याचे आणि या वसाहती कायमच्या पर्यावरण प्रेमी राहतील याची दक्षता या संस्थेमार्फत सातत्याने घेण्यात येईल हा तार्इंचा मुख्य उद्देश होता.

रोशनी बोधचिन्ह स्पर्धा

मुलांच्या कल्पनाशक्तिला वाव मिळावा आणि तेच या रोशनीचा वारसा भविष्यकाळात समर्थपणे चालवतील या हेतूने ‘ रोशनी बोधचिन्ह स्पर्धा ’ ही सीआयआयइंडिया@७५ या संस्थेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत १०,००० शाळांचा समावेश होता. ३,५०० स्पर्धकानी या स्पर्धेत भाग घेतला.

सुवर्णमयूर पदकाचा मान

रोशणीच्या या पर्यावरण कार्याबद्दल २०१२ साली इस्टिट्युट ऑफ डायरेक्टर्स या संस्थेद्वारे ‘पर्यावरण व्यवस्थापन’ यासाठी सुवर्णमयूर पदकाचा सन्मान प्राप्त झाला.

सुरक्षित नागरी वसाहती

रस्त्यावरील मोठे खड्डे आणि सुरक्षेची काळजी न घेता खोदून नंतर तशाच सोडून दिलेल्या मोकळया बोअरवेलमध्ये पडून अनेक मुलांना अपघाताचा दुर्दैवी सामना करावा लागत होता. तार्इंनी याची दखल घेऊन नागरी समित्यांना कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश दिले. यामुळे मोठ्या प्रमाणावर अशा अपघातांचे प्रमाण कमी करता येईल  म्हुणुन रोशनीच्या कार्यक्रमात याचा अंतर्भाव करण्यात आला.

रोशनीचा प्रसार

रोशनीचे स्वतंत्र संकेतस्थळ आहे (roshni-rb.gov.in). या संकेतस्थळावर राष्ट्रपती भवनाच्या परिसरांत हरित कामाच्या सातत्याने चाललेल्या प्रगतीची अहवाल आहे. यामुळे जनतेला मनांत अशा प्रकारच्या कामाबद्दल चाललेल्या कामाची माहिती होईल व ते यापासून प्रेरणा घेतील. त्यांची पर्यावरणाबाबतची आस्था वाढेल आणि यातून शाश्वत विकासाची बीजे रोवली जातील.

National Portal Of India
Make in India
National Informatics Center
GOI Web Directory

संपर्क साधा

Translate »