ऍन इन्स्पिरेशनल जर्नी : प्रतिभा देवीसिंग पाटील

अवलोकन
या ग्रंथाद्वारे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती यांचे जीवन आणि कार्य यासंबंधीचे विवेचन आहे. या पदावर येण्यापूर्वी त्यांनी इतर अनेक महत्वाच्या पदांवर काम केलेल्या कामाची माहितीही दिली आहे. १९५० ते १९६० च्या काळांत स्त्रीयांना नामोहरण करणार्या काळात प्रतिभाताईंनी शैक्षणिक क्षेत्रांत मिळविलेले प्राविण्य, त्यांची जबरदस्त इच्छाशक्ति, मताचा ठामपणा, विविध क्षेत्रावर त्यांचे निर्विवाद प्रभुत्व, अभ्यास आणि कार्यकुशल कामगिरी आणि हाती घेतलेल्या कामाची प्रामाणिकपणे पूर्ती यामुळे भारतातील सर्वोच्च पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा प्रेरणादायक आहे. आपल्या या प्रेरणादायी प्रवासाचे श्रेय त्या भारतीय जनतेच्या सदिच्छा आणि परमेश्वराला देतात. त्यांच्या या राजकीय प्रवासांत त्यांच्या कुटुबीयांनी दिलेली साथ यामुळे त्यांची कामगिरी परिणामकारक ठरली. अनेक क्षेत्रातील त्यांची नेत्रदिपक कामगिरी या त्या स्वत: कधीच बोलून दाखवित नाहीत, त्यामुळे त्यांच्याविषयी लिहावे लागते ते केवळ जनतेच्या माहितीसाठी हा या पुस्तकाचा मतितार्थ आहे. या पुस्तकाचे प्रकाशन ताईंच्या ७६ व्या वाढदिवशी डिसेंबर १९ रोजी माजी राष्ट्रपती मा. डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते झाले.
पुस्तकाचा तपशील
लेखक : रसिका चौबे आणि डॉ छाया महाजन
भाषा : इंग्रजी
बाइंडिंग : हार्डकवर
प्रकाशक : एस चंद ग्रुप
ISBN : ९७८८१२१९३५०४३, ८१२१९३५०४०
एडिशन : मल्टिकलर एडिशन, २०१०
एन्गेजिंग द वर्ल्ड : प्रतिभा देवीसिंग पाटील

अवलोकन
भारतांतील तीन बड्या व्यावसायिक संघटना - कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय), द फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री (एफआयसीसीआय) आणि असोसिएटेड चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया (आसोकॅम) यांनी संयुक्तरीत्या आपल्या व्यावसायिक प्रतिनिधींनी विषद केलेले आपले अनुभव ‘एन्गेजिंग द वर्ल्ड’ हे पुस्तक प्रतिभाताईंना राष्ट्रपती भवनांतील कार्यक्रमांत समारंभपूर्वक १८ जानेवारी २०१२ रोजी सादर केले.
रीइन्वेंटिंग लिडरशीप : प्रतिभा देवीसिंग पाटील

अवलोकन
ताईंनी भारतीय राजकारणाला अनोखे वळण दिले. त्यांचा राजकीय प्रवास हा काही योगायोग नव्हता. त्यामागे त्यांची निश्चया वृत्ती, समाजाप्रती आपली सकारात्मक भुमिका आणि जनतेची सेवा ही केवळ एका स्त्रीचे कार्य म्हणून पाहिले जाऊ नये. सातत्याने आपल्या आयुष्याची ५० वर्षे सार्वजनिक सेवेसाठी दिली. आपल्या व्यकितगत आणि सार्वजनिक जीवनाचा त्यानी चांगला मेळ राखला. त्यांचे कार्य, कल्पना आणि जीवनांकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि त्यांनी घेतलेले धोरणात्मक निर्णय याच्याविषयी या पुस्तकांत सविस्तरपणे लिहिले गेले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ भारताचे उपराष्ट्रपती मा. हमीद अन्सारी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ख्यातनाम शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर , आणि भुतपूर्व मंत्री मा. भीष्म नारायण सिंग हे उपस्थित होते.
पुस्तकाचा तपशील
लेखक : सुनयना सिंग
पृष्ठे : २२६
प्रकाशक : अलाईड पब्लिशर्स ( मार्च २१, २०१६)
भाषा : इंग्रजी
ISBN-१० : ८१८४२४८१६४
ISBN-१३ : ९७८-८१८४२४८१६६
प्रतिभापर्व

अवलोकन
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती यांचे बालपण, कुटुंब, राजकीय प्रवास आणि जीवनविषयक दृष्टीकोन याची माहिती दिली आहे.
पुस्तकाचा तपशील
लेखक : स्वाती महाळंक
ISBN-१० : ८१८९९५९२१२
ISBN-१३ : ९७८८१८९९५९२१०
बाइंडिंग : पेपर बॅक
प्रकाशनाची तारीख : २००७
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स पुणे
पृष्ठे : १०८
भाषा : मराठी
राईज इंडिया (१ - ६ खंड)

अवलोकन
या सहा खंडांमध्ये ताई राष्ट्रपतीपदांवर असताना त्यांनी विविध समारंभप्रसंगी दिलेल्या व्याख्याने यांचा प्रामुख्याने समावेश आहे. भारतीय प्रजासत्ताकाची उत्तम उभारणी व्हावी आणि ते सामर्थ्यशाली राष्ट्र बनावे ही त्यांची आकांक्षा या व्याख्यानातून दिसून येते. त्यांच्या प्रत्येक भाषणांत पायाभूत सोयींचा विकास, शांतताप्रिय सहनशील समाज उभारणीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांच्या भाषणातून प्रतित होते. या सहा खंडातून त्यांनी व्यक्त केलेले विचार आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यांसाठी आखलेल्या योजनांसंबंधीचे विचार या खंडात पुढीलप्रमाणे विभागले गेले आहेत.
खंड १ : शेती, तरुणांचे प्रश्न, आर्थिक विकास, भारतीय संस्कृती, शाश्वत विकास
खंड २ : शैक्षणिक सबलिकरण, जागतिकीकरणांत सक्रिय सहभाग
खंड ३ : जागतिक मैत्री, आरोग्य, न्याय आणि मानवी अधिकार
खंड ४ : प्रसार माध्यमे, निसर्ग आणि पर्यावरण, संसद, ळोकशाही, शांतता, सदिच्छा आणि सहकार्य
खंड ५ : व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व आणि जबाबदारी, ग्रामीण विकास आणि सहकार
खंड ६ : शास्त्र आणि तंत्रज्ञान, पर्यटन, स्त्रि सबलिकरण, शााश्वत नागरीकरण
पुस्तकाचा तपशील
लेखक : डॉ. कन्हैया त्रिपाठी
भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी
बाइंडिंग : हार्डकवर
प्रकाशक : मानसी प्रकाशन
ISBN : ९७८९३८०५१५०७६
एडिशन : मल्टिकलर एडिशन, २०१२ (खंड १ ते ६)