भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती : प्रेरणात्मक प्रवास

ताईंचा आपला शैक्षणिक अनुभव, नम्र स्वभाव, प्रबळ राष्ट्रनिष्ठा आणि उत्तम अशा राजकीय कारकिर्दीचे पाठबळ यामुळे त्यांना या सर्वोच्च पदावर जाण्याचा बहुमान प्राप्त झाला. तत्पुर्वी हे पद डॉ. अब्दुल कलाम यांच्यासारख्या प्रखर बुद्धिमत्तेच्या शास्रज्ञाने भूषविले होते. त्यांच्यानंतर या पदावर काम करणे हे कठीण आहे असे समजले जात होते. त्यामुळे या पदाचा लौकिक सांभाळणारी योग्य व्यक्ती असली पाहिजे असा एक सूर होता. ताईंनी आपली या पदावरची योग्यता, यथायोग्य आचरण, विनयशीलता, शांत स्वभाव आणि प्रचंड आत्मविश्वासाने राष्ट्रपती भवनात प्रवेश केला. तो काळ राजकीय दृष्ट्या खूप संवेदनशील होता. अशा या वातावरणात एका स्त्रीला जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची सूत्रे चांगल्या प्रकारे सांभाळता येतील का ? ही शंका व्यक्त केली जात होती. चांगले बहुमत मिळवून त्यांनी आपल्या टीकाकारांची तोंडे बंद केली. आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी न डगमगता जनहित व घटना अबाधित ठेवण्याची शपथ पाळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

व्हिडिओ

माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचा शपतग्रहण विधी.

” प्रजासत्ताकाची पहिली सेविका होणे हा अनुभव मी विनम्रतेने स्वीकारत आहे “

– श्रीमती प्रतिभाताई पाटील

ग्रामीण सुधारणांना प्रोत्साहन

Pratibha Patil

ग्रामीण भागातून आलेल्या श्रीमती प्रतिभा पाटील यांनी नेहमी ग्रामीण भागातल्या लोकांच्या क्षमतेवर विश्वास दर्शिवला आहे. परंतु ग्रामीण भागात राहणा-या लोकांना त्यांची क्षमता दाखवण्याची योग्य अशी संधी मिळत नाही. त्यासाठी, श्रीमती प्रतिभा पाटील यांनी ग्रामीण जनतेच्या अभिनव विचारांना एक व्यासपीठ मिळावे म्हणून राष्ट्रपती भावनाचीच निवड केली.

सामाजिक दृष्ट प्रवृत्तीला विरोध

Pratibha Patil - Fighting Social EVILS
 • स्त्री भ्रूणहत्या
 • लिंग असमानता
 • नशा आणि मादक द्रव्याविरुध्द लढा
 • हाताने मैला स्वच्छ करण्याच्या दुष्प्रवृत्तीविरुध्द लढा
 • शैक्षणिक संस्थामध्ये होणाऱ्या रॅगिंगबाबत चिंता

जागतिक व्यवसायाची उभारणी

Pratibha Patil Information

राष्ट्रपतीपदांवर असताना तार्इंनी राष्ट्राचे हित जपण्यासाठी आणि द्विस्तरीय संबंध सुधारण्यासाठी परदेशांना भेटी दिल्या. यात प्रामुख्याने जी-5 (रशियाचीन आणि युके) चा समावेश होता. याबरोबरच उपखंडातील लॅटिन अमेरिका (ब्राझिलमेक्सिको आणि चिली) यांच्यासमवेत पहिल्यांदाच व्यवसायवाढीच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले. तसेच वसाहतवाद आणि वर्णद्वेषाविरुध्द लढा देणाऱ्या अफ्रिकेचा (मॉरिशससेशेल्स आणि दक्षिण अफ्रिका) दौराही त्यांनी केला. सार्कच्या विकासातील सहभाग (भूतान आणि ताजिकीस्थानच्या) भेटीत भारताची मध्य-आशियातील महत्त्वाची भूमिका विशद केली. पूर्व आणि दक्षिण आशिया (लाओसकंबोडियाइंडोनेशियाव्हिएतनामदक्षिण कोरिया आणि मंगोलिया) यांना भेट देताना भारताचे त्यांच्याबाबत असलेली सौहार्दाची भूमिका त्यांनी आपल्या भेटीत विषद केली .

भारतीय लष्काराच्या सरसेनापती

Smt. Pratibha Patil

राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ताई या भारतीय लष्काराच्या पहिल्या महिला सरसेनापती बनल्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी दुर्गम अशा लष्काराच्या छावण्यांना भेटी दिल्या. ते करत असलेल्या अलौकिक राष्ट्रीय कार्याबद्दल सैन्यदलाना नेहमी प्रोत्साहन दिले. त्यांचे प्रश्न समजून घेतले. जवानांचे मनोबल वाढावे म्हणून सुखोई ३० या super-sonic speed ने जाणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या फायटर विमानातून GI सूट घालून वयाच्या ७४ व्या वर्षी अवकाश भरारी घेतली अशी भरारी घेणा-या त्या जगातील पहिल्या एकमेव महिला ठरल्या. त्याच दिवशी त्यांना रशियाचे राष्ट्रपती मिदवेदेव्ह यांचा लगेचच फोन आला, ताईंचे या धैर्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. हा आयुष्यातील त्यांचा महत्वाचा क्षण होता.

अधिक वाचा

सामाजिक प्रश्नांशी बांधिलकी

 • image

  उपचारांची गरज असलेल्यांना मदत

  कानपूर जिल्ह्यातील श्रुती आणि गौर भाटिया या जुळया बहिणींना अनुवंशिक अशा हाडाच्या आजाराने ग्रासले होते. अशा आजारपणातही त्यांची कल्पकता आणि निर्मितीक्षमता वाखाणण्याजोगी होती. त्यांचा २००७ साली राष्ट्रीय पातळीवर ‘बाल श्री गौरव पारितोषिक’ देऊन तार्इंच्या हस्ते गौरव केला गेला. आजारी असूनही त्यांच्या उत्साही आणि दुर्दम्य आशावादाने ताई भारावून गेल्या. आपल्या कानपूरच्या भेटीत त्यांनी या मुलींची त्यांच्या पालकांसमवेत भेट घेतली. पालकांनी आपल्या मुलींच्या औषधोपचाराचा खर्च आपल्या आवाक्याबाहेर जात असल्याचे या प्रसंगी सांगितले. ताईंनी मुलींच्या उपचारासाठी आवश्यक ती मदत देण्यासाठी राज्य सरकारला निर्देश दिले. त्याची कार्यवाही होईल याची दक्षताही घेतल्याने मुलींना आवश्यक ती वैद्यकीय सुविधा मिळाली.

  अधिक वाचा
 • image

  ग्रामीण भागातील कौशल्याला प्राधान्य

  छत्तीसगड राज्यातील दुर्गम ग्रामीण भागात शालेय शिक्षण घेणारी पिंकी ही टाकाऊ वस्तूंपासून चांगल्या वस्तू तयार करण्याच्या कामात कुशल होती. तिच्या या कल्पकतेच्या कामातून होणाऱ्या उत्तम निर्मितीने ताईंना प्रभावित केले होते. मार्च २००९ मध्ये राष्ट्रपती भवनामध्ये होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या’ कार्यक्रमात पिंकीला – तिने तयार केलेल्या वस्तू प्रदर्शित करण्यासाठी आवर्जून निमंत्रित केले गेले. तार्इंच्या या प्रोत्साहनामुळे पिंकी ही अनेक बचत गटांना अशा वस्तू तयार करण्यासाठी मार्गदर्शन करणारी खास प्रशिक्षक बनली. राष्ट्रपती भवनातील तार्इंची भेट पिंकीच्या आयुष्याला उत्तम कलाटणी देणारी ठरली.


  अधिक वाचा
 • image

  वंचित आणि अनाथ मुलांच्या समवेत भोजन

  राजधानीत अनेक संस्था अनाथ आणि गरीब मुलांच्या कल्याणार्थ काम करत आहेत. अशा संस्थातील मुलांना त्यांनी राष्ट्रपती भवनावर भोजनासाठी निमंत्रित केले. त्यांच्याबरोबर सहभोजन घेतले. त्यांच्याशी बातचीत करून त्यांना आलेले अनुभव आणि भविष्यकाळातील त्यांच्या महत्त्वाकांक्षा जाणून घेतल्या. त्यांनी अधिकाधिक शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जावे. त्यांच्या हाती आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहे असे आवर्जून सांगितले. त्यांना राष्ट्रपती भवन आणि मुघल गार्डनची सहलही घडवून आणली. त्या मुलांची विशेष काळजी घेतली जाईल याकडे त्यांनी लक्ष दिले."

  अधिक वाचा

जनसंपर्क

Pratibha Patil
श्रीमती प्रतिभा पाटील यांना नेहमीच विश्वास होता की राष्ट्रपती आणि ग्रामीण लोकांच्या विचारांची नीट देवाण घेवाण व्हावी. परंतु, सार्वजनिक सभा वगळता या लोकांबरोबर संपर्कात राहण्याबद्दल त्यांना चिंता होती. याच चिंतेमुळे आणि अशा सुधारक विचारांमुळेच त्यांनी ग्रामीण लोकांसाठी विविध उपक्रम सुरु करण्याचे प्रोत्साहन मिळाले आणि त्यांनी राष्ट्रपती भावनांचे द्वार ग्रामीण लोकांसाठी खुले केले.
Pratibha Patil Information

राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र ही भारत सरकारची माहिती संचरण तंत्रज्ञानाची अधिकृत संस्था आहे. त्यांनी भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत संकेतस्थळ (http://pratibhapatil.nic.in) निर्माण केले आहे. या संकेतस्थळांवर ताईंची २००७-२०१२ या काळांत राष्ट्रपतीपदांवर असताना त्यांनी विविध प्रसंगी दिलेली व्याख्याने, महत्वाचे प्रसंग, परदेशी दौरे, छायाचित्रे आणि प्रसिध्दीपत्रकांचा समावेश आहे.

सामाजिक कार्यक्षेत्र

National Portal Of India
Make in India
National Informatics Center
GOI Web Directory

संपर्क साधा

Translate »