ताज्या बातम्या आणि कार्यक्रम
नारी शक्ती वंदन कायद्यावर माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले मत
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी ११ एप्रिल २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ‘नारी शक्ती वंदन अधिनियमा’स (महिला आरक्षण कायदा) आपला पाठिंबा व्यक्त केला. पत्रात त्यांनी म्हटले की, “मला खात्री आहे की हा पुरोगामी पुढाकार असंख्य महिलांच्या, विशेषतः ग्रामीण आणि उपेक्षित समाजातील महिलांच्या आकांक्षांना नवी उभारी देईल. यामुळे त्यांना नेतृत्व स्वीकारण्यासाठी आणि राष्ट्रउभारणीत मोलाचे योगदान देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच, लैंगिक न्याय आणि सर्वसमावेशक लोकशाहीप्रती भारताच्या अढळ वचनबद्धतेचा एक स्पष्ट आणि शक्तिशाली संदेश याद्वारे जगाला मिळेल.” महिला सक्षमीकरण आणि देशाच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
माझ्या प्रेरणा



शैक्षणिक बाबींना मी नेहमीच प्राधान्य देत आले आहे. आधुनिक शिक्षणाची गंगा ही


शैक्षणिक बाबींना मी नेहमीच प्राधान्य देत आले आहे. आधुनिक शिक्षणाची गंगा ही प्रत्येक व्यक्ति, स्त्री-पुरुष, मुलगा-मुलगी यांच्यापर्यंत सहजपणे पोचली पाहिजे. विशेषकरून स्त्रीयांचे सक्षमीकरण हे माझ्या दृष्टीने अधिक महत्वाचे आहे, ते प्रत्यक्षात आल्यांस राष्ट्राच्या सक्षमीकरणाची वाटचाल सुलभ बनेल.




















माझ्या सामाजिक कार्याचे क्षेत्रे एका दृष्टीक्षेपात....
शिक्षण
महिला सशक्तीकरण
ग्रामीण विकास
पर्यावरण